Pune City Live

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच – SC

0

 

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यावयाच लागतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.  तारीख बदलू शकता, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय दिला आहे, पण परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे.


 त्यामुळे, अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी घ्यायच्या हा निर्णय राज्य सरकार घेईल. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा घेता येणार नाहीत, असे आम्ही कोर्टापुढे अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे, युजीसीकडे विनंती करण्याबाबत लवकरच ठरवू, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देऊ केली जाऊ शकत नाही असं बोलणारे सांगत आहे.कोर्टाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.