माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट; रोहित पवारांचं आईसाठी भावूक ट्विट
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या शहरांनी ‘स्वच्छ सर्वेक्षणात’ भाग घेतला आहे. या स्पर्धेत नामांकन मिळवण्याचा निर्धाराने नागरिकांकडून गेल्या ७५ दिवसांपासून श्रमदान मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार देखील सहभागी होत आहे. त्यामुळे आपल्या आई बद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावूक प्रतिक्रियाच पवार यांनी व्यक्त केली आहे.