Pune City Live

ओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमती झाल्या आणखीन स्वस्त ,जाणून माहिती !

0

 

प्रसिद्ध चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो ने त्यांच्या Oppo A33 या स्मार्टफोन ची किंमत कमी केली आहे .Oppo ने एक महिन्यापूर्वी  हा  स्मार्टफोन Oppo A33 देशात लाँच केला होता. आता कंपनीने ओप्पो ए ३३ च्या किंमतीत कमी केली आहे. फ्लिपकार्टवर बनवलेल्या पेजवरून या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. जर तुम्हाला ओप्पोचा हँडसेट खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी खास संधी आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा HD  प्लस डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे .


ओप्पोच्या या फोनची किंमत ११ हजार ९९० रुपये इतकी आहे. या फोनला या किंमतीत लाँच केले होते. परंतु, आता एक हजार रुपयांच्या कपातीनंतर या फोनची किंमत १० हजार ९९० रुपये झाली आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगमध्ये फोनची लेटेस्ट किंमतीसोबत अपडेट केले आहे. परंतु, कंपनीने अद्याप अधिकृत किंमत कपात केल्याची घोषणा केली नाही. ओप्पोचा हा फओन मूनलाइट ब्लॅक आणि मिंट क्रीम कलरमध्ये उपलब्ध आहे .


Oppo A33 चे खास वैशिष्ट्ये
ओप्पोच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा होल HD + डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूसन 720×1600 पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला  आहे. ओप्पोच्या या फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.