Pune City Live

मदर टेरेसा मराठी माहिती – पद्मश्री , भारत रत्न, नोबेल पुरस्कार

0

भारतरत्न आणि नोबेल पुरस्काराने सन्मानित केलेल्या मदर टेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 या सालि अल्बानिया मध्ये झाला होता.
मदर तेरेसा जन्माचे नाव Anjezë Gonxhe Bojaxhiu

एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्‍याची मुलगी.    तिचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स  ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष  डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर   तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली (१९२९).

 मदर टेरेसा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
भारत सरकारने मदर तेरेसा यांना 1962 मध्ये पद्मश्री ही उपाधी दिली.
1988 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना aarop the British empire ही उपाधी दिली.
बनारस हिंदू विश्वविद्यालय त्यांना डि. लीट ही पदवी देण्यात आली
19 डिसेंबर 1979 रोजी त्यांना ते करत असलेल्या मानव कल्याणासाठी कामासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मदर टेरेसा यांच्यावर लिहिलेली मराठी पुस्तके

  • भारतरत्न मदर तेरेसा (रमेश तिरूखे)
  • मदर तेरेसा : प्रतिमेच्या पलीकडे – १९१०-१९९७ (ॲन सेबा)
  • मदर तेरेसा (आशा कर्दळे)
  • (दीन दु:खितांची विश्वमाता) मदर तेरेसा (शंकर कऱ्हाडे)
  • (माणुसकीचा नंदादीप) मदर तेरेसा (शांताराम विसपुते)
  • (विश्वमाता) मदर तेरेसा (सु.बा. भोसले)

Leave A Reply

Your email address will not be published.