स्मार्टफोन कंपनीचं धक्कादायक कृत्य; 20 Virus कोटी लोकांच्या मोबाईलमध्ये टाकला

0

  जर तुम्हाला चीनी मोबाईल फोन्सवर (Chinese Mobile Phones) विश्वास नसेल, तर तुमचं हे म्हणणं खरं आहे. नुकतंच चीनच्या एका स्मार्टफोन कंपनीने अशी गोष्ट केली आहे, ज्याने सर्वच जण हैराण आहेत. चीनी कंपनीने मुद्दाम 20 कोटी लोकांच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस टाकला आहे. मोठे पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारे व्हायरस टाकण्याचा प्रकार त्यांनी केला. नुकताच या गोष्टींचा खुलासा झाला असून मोठी खळबळ माजली आहे.

चीनची मोबाईल बनवणारी कंपनी जिओनी (Gionee) यात दोषी आढळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिओनी स्मार्टफोन कंपनीने जवळपास 20 कोटी स्मार्टफोनमध्ये, स्वत:च जाणूनबुजून मालवेअर व्हायरस टाकला आणि याद्वारे मोठी कमाई केली. या बेकायदेशीर कामासाठी चीनच्या एका कोर्टाने, स्मार्टफोन निर्माता कंपनी जिओनीला दोषी ठरवत मोठा निर्णय दिला आहे.

Xiaomi चा QLED TV येतोय , इतकी आहे किंमत आणि हे आहेत फिचर

मिळालेल्या माहितीनुसार, चीनी कंपनी जिओनीची सहयोग कंपनी शेनझेन झिपू टेक्नोलॉजीने (Shenzhen Zhipu Technology Co. Ltd) युजर्सच्या मोबाईलमध्ये अपडेटच्या नावाखाली, ट्रोजन हॉर्स व्हायरल (Trojan Horse Virus on Mobile phones) टाकला. हा व्हायरस फोनमध्ये कोणत्याही माहितीशिवाय, नको असेलल्या जाहीराती दाखवण्यास आणि दुसऱ्या मॅलिशियस ऍक्टिव्हिटीज सुरू करण्यात मदत करत होता. कंपनीने अशा जाहीरातींच्या मदतीने जवळपास 4.2 मिलियन डॉलरची कमाई केली.

https://lokmat.news18.com/technology/chinese-smartphone-company-gionee-puts-virus-in-20-crore-mobile-phone-gionee-found-guilty-infecting-phones-with-malware-trojan-virus-mhkb-503276.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.