आज ‘गोवा मुक्ती दिवस’ गोव्याला स्वातंत्र्य उशीरा का मिळाले?
आज ‘गोवा मुक्ती दिवस‘
भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली.
कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हेदेखील गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.
गोमंतकीयांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस स्वतः पारतंत्र्यात राहून अनुभवला. भारताला स्वातंत्र्य मिळून लोकांना मोकळा श्वास घेता येऊ लागला मात्र गोमंतकीय जनता अत्यंत्य हाल अपेष्टांमध्ये जगत होती. जनमानसात रोष होता.
१९ डिसेंबर १९६१ साली पोर्तुगीजांविरुद्ध सुरु असलेल्या मुक्तीलढ्याला यश आले. आमचे सर्व गोयंचो मंडळींना गोवा मुक्ती दिनाच्या तथा गोवा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.