दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू प्यायल्यावर कसे वाटते ? जाणून घ्या कसे वाटते ?
कसं वाटतं? भारीच वाटतं–निदान सुरुवातीच्या काळात तरी!
तो कडू घोट गिळला की मेंदूत झिणझिण्या यायला लागतात, हलकं हलकं वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं.
बायकोची कटकट, मुलांची भुणभूण, ऑफिसचं प्रेशर, पैशाचं टेन्शन, सगळं सगळं दूर पळतं. मस्तपैकी हवेत तरंगल्यासारखं वाटतं!
इथपर्यंत ठीक आहे. पण यापुढच्या गोष्टी दारू कोण पितंय यावर अवलंबून असतात.
आपण जरा दारू पिणाऱ्या माणसांचे गट बघू. त्यातल्या प्रत्येकाला दारू प्यायल्यावर कसं वाटतं ते बघू.
अलिकडच्या काळात त्यासुद्धा तितकंच तणावपूर्ण आयुष्य जगतात. कामाच्या जबाबदाऱ्या कदाचित पुरुषांपेक्षा थोड्या जास्तच उचलतात.
या सगळ्या (स्त्री आणि पुरुष) सोशल ड्रिंकर्ससाठी दारू पिणं हे एक निमित्त असतं. कधी आनंद साजरा करण्यासाठी, कधी मन मोकळं करण्यासाठी.
पण एक महत्त्वाचं, सोशल ड्रिंकर कधी एकटा पित बसत नाही!
बऱ्याचदा लोक म्हणतात, “त्याला फार टेन्शन होतं म्हणून तो एवढा दारू प्यायला लागला.”
पण बऱ्याचदा हे बरोबर नसतं. याउलट खरं कारण “त्याच्यात टेन्शन सहन करायची ताकद नव्हती म्हणून तो दारूत बुडाला. आता त्याच्यात दारूतून बाहेर यायची ताकद शिल्लक नाही!”
होय, दारू सोडायची ताकद नष्ट होणं म्हणजेच दारुडेपणा. स्वतःला थांबवायचे मनाचे ब्रेक्स तुटणं म्हणजे दारुडेपणा.
दारुडेपणा ही वाईट सवय नाही–तो एक आजार आहे!
कोरा (Quora) या प्रसिद्ध वेबसाईट वर संतोष देशपांडे यांनी दिलेले उत्तर!