पासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर
पासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर
मुंबई, 08 ऑक्टोबर: कुठलाही ब्राउझर वापरत असताना पासवर्डची सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो, अशा स्थितीत काही ब्राउझर तुम्हाला सतर्क करतात, सुरक्षेचे विविध पर्याय देतात, एक उदाहरण म्हणजे तुम्ही नेहमीचा संगणक सोडून दुसऱ्या संगणकावर तुमचा ई-मेल सुरू केल्यास तातडीने तुमच्या फोनवर याबाबत अलर्ट येतो आणि तुम्हाला विचारणा होते, गूगल क्रोमचं हे फिचर आहे.
गुगल क्रोमने नुकतीच 86 बिल्ड रिलीजसह नवीन फिचर आणले आहे. गुगलच्या डेस्कटॉपवरील ब्राउझरमध्ये असलेलं पासवर्ड हॅक झाल्यावर अलर्ट देणारं फीचर आता कंपनीने मोबाइल ब्राउझरमध्येही उपलब्ध करून दिलं आहे. तुमचा पासवर्ड हॅक करून कोणी तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करायला प्रयत्न केला तर हा ब्राउझर तुम्हाला अलर्ट पाठवणार आहे. Mozilla Firefox, Apple Safari आणि Microsoft Edge हे ब्राऊझर ही सुविधा देतात, तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे का ते तुम्हाला सांगतात.