रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत कर्जत जामखेड पोलिसांना दिलेल्या नव्या कोऱ्या गाड्या बघितल्या का ?
कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार यांनी कर्जत-जामखेड पोलिसांच्या ताब्यात काही नवीन वाहनांचा समावेश केला आहे या त्यांनी कर्जत-जामखेड पोलिसांना भेट दिले आहेत.
या वाहनांचे फोटो खालील तुम्ही पाहू शकता.
कर्जत-जामखेड पोलीस दलासाठी एकात्मिक विकास संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळालेली वाहने या दोन्ही तालुक्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होऊन गुन्हेगारी रोखण्यास तसेच सर्वसामान्यांना, माता भगिनींना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत कर्जत-जामखेड येथील पोलीस बांधवांना देण्यात येणाऱ्या वाहनांचा लोकार्पण सोहळा आज मंत्रालय येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, एडीजी श्री. जगन्नाथन, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम असून कर्जत-जामखेडचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने साकार होत आहे. या वाहनांमुळे पोलीस दलास अधिक बळ प्राप्त होऊन गस्तीसाठी ही वाहने उपयोगी पडतील. राज्यातील इतर आमदारांनीदेखील अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत व आपल्या मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस दल बळकटीकरणात पुढाकार घ्यावा.