BEST WEDDING PHOTOGRAPHER IN AURANGABAD अनुभवातून बनलो औरंगाबादचा प्रोफेशनल फोटोग्राफर – सुबोध झडते
लहानपणापासूनच कॉम्प्युटरची आवड, घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील , कॉम्प्युटर दुरुस्तीची कामे करून, आलेल्या अडचणींचा सामना करत, औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रोफेशनल फोटोग्राफर बनलेल्या सुबोध झडते यांचा हा प्रवास जाणून घेवू.
लहानपणापासून वडिलांना मेहनत करताना पाहून सुबोध ला नेहमी वाटायचं कि, वडिलांना आपण मदत करावी त्यांचं ओझं हलकं करावं.
दहावीच्या शिक्षणानंतर सगळ्यांना एका कंपनीत काम होतं पण सुबोध चा मन काही कंपनी मध्ये रमेना. काही दिवसानंतर सुबोध ने कंपनी सोडून दिली. पहिल्यापासूनच कॉम्प्युटर विषयक आवड असल्यामुळे कॉम्प्युटर कोर्स करण्याचे ठरवले. संगणकाविषयी सुबोध ने पूर्वीच भरपूर एकलं होत परंतु क्लास लावण्यासाठी सुबोध कडे पैसे नव्हते. म्हणून सुबोध मिळेल ते काम करू लागला व हळू हळू त्याने पैसे जमवले. व ६ महिन्याचा संगणकाचा पूर्ण केला.त्याचा कॉम्पुटर शी एवढा घट्ट नातं जुळला कि त्याने पुढे कॉम्पुटर चे सगळे कोर्सेस पूर्ण करून तो त्याच क्लास मधील विद्यार्थाना शिकाऊ लागला.आणि सोबतच कॉम्पुटर हार्ड वेअर चे कामं घेऊ लागला.
एक दिवस त्याला एका फोटो स्टुडिओ मधून कॉल आला आणि तो कॉम्पुटर रिपेरिंग साठी त्या फोटो स्टुडिओ मध्ये गेला. तो दिवस सुबोध च्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस होता, कारण या नंतर सुबोध हार्ड वेअर ची कामे करणार नव्हता. सुबोध चा स्टुडिओ च्या मालकाशी चांगली मैत्री झाली
व सुबोध रोज त्या फोटो स्टुडिओ मध्ये जाऊ लागला. त्या मालकासोबत एवढी मैत्री वाढली कि तो पूर्ण दिवस त्यांचा स्टुडिओ मध्ये बसायचा. याच दरम्यान सुबोध ला फोटोग्राफी ची आवड निर्माण झाली. त्याची आवड त्याला स्टुडिओ मध्ये खेचून ठेवत होती. आता सुबोध हळू हळू फोटोग्राफी मध्ये रमू लागला. तो आता संगणकाच्या ऐवजी कॅमेरा हातात घेऊन जमेल तसे फोटो काढायला लागला. पूर्ण जग आता तो डोळ्याने पाहू लागला. त्याला वाटू लागले कि आपला जन्म हा फोटोग्राफी च झाला आहे. म्हणून कधीही हट्ट न धरणाऱ्या सुबोध ला त्याची इच्छा पाहून घरच्यांनी पैसे जमवून कॅमेरा खरेदी करून दिला. व आपल्या कामाकडे जास्त रंगवणे
परंतु हे सर्व करत असताना सुबोध ला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. फोटोग्राफी शिकण्यासाठी त्याने अनेक फोटोग्राफर कडून मदत मागितली परंतु
त्याला सर्वच लोकांनी हाकलून लावले. सुबोध नवीन फोटोग्राफर असल्या कारणाने त्याला कोणी काम देखील नव्हतं. म्हणून सुबोध ने कधीच हार मानली नाही. फोटोग्राफी शिकत असताना अनेक संकटांना तोंड देत तो पुढे चालत राहिला.या सर्व अनुभवा मधून सुबोध एक शिकला कि जर आपल्याला असेल तर लोकांना काम दाखवावा लागेल आणि शेवटी तो दिवस उजाडलाच. ज्या दिवसाची सुबोध आतुरतेने वाट बघत होता, अहो रात्र जागरण करून फोटोग्राफी चा अभ्यास करत होता, एक दिवस असा होता कि लोक त्याला काम मिळत नव्हतं आणि आज सुबोध कडे कस्टमर्स च्या रंग लागायला लागल्या. कामा मध्ये एवढा व्यस्थ झाला कि आज तो औरंगाबाद जिल्ह्या मध्ये एक नावाजलेला फोटोग्राफर म्हणून ओळखला जातो. आज social media च्या माध्यमातून त्याला आता खूप काम मिळू लागली.
सुबोध त्याच्या यश मागचं कारण नेहमी सांगतो कि यश मिळवणं हे आपल्याच हातात आहे. जो जीव ओतून मेहनत करणार, यश त्याच्या पायाशी असणार.