कोरणा मुळे अजूनही भारतातील अनेक कंपन्या अशा आहेत ज्या घरूनच काम करून घेत आहेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मोबाईल डाटा ची उपलब्धता लक्षात घेता वोडाफोन आयडिया लिमिटेड म्हणजेच Vi ने आपला नवा वर्क फ्रॉम होम प्लॅन आणलेला आहे. Vodafone Idea च्या या नव्या प्लॅन बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
वोडाफोन आयडिया चा नवा प्लॅन
वोडाफोन आयडिया या नव्या प्लॅन ची किंमत ही 351 रुपये इतकी आहे. याच्या व्यतिरिक्त माहितीही कंपनीच्या वेबसाईटवर तसेच ॲप मध्ये दिलेली आहे. हा कंपनीचा वर्क फ्रॉम होम प्लॅन आहे. या प्लेन च्या माध्यमातून ग्राहकांना 100 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. याची उपलब्धता ही 51 दिवसांची असणार आहे.
या प्लॅन बरोबरच कंपनीने आपला अजून एक देखील प्लॅन लॉन्च केला आहे. तो आहे 251 रुपयांचा यामध्ये ग्राहकांना अठ्ठावीस दिवसांसाठी 50 जीबी डाटा मिळत आहे.
कंपनीचा हा प्लॅन मात्र काही निवडलेल्या सर्कल मध्येच असणार आहे. यामध्ये दिल्ली, आंध्रप्रदेश ,केरळ, गुजरात आणि मध्य प्रदेश.