Pune City Live

WhatsApp वर आली आहे आणखी एक नवीन सुविधा

0

 

भारतात इन्स्टंट मेसेजिंग साठी मोठ्या प्रमाणात WhatsApp व्हाट्सअप चा वापर केला जातो.व्हाट्सअप वर दररोज लाखो मेसेज आणि फोटोज व्हिडिओज व्हायरल होत असतात. दररोज अनेक प्रकारचे फेक मेसेज, न्यूज , फेक लिंक्स, फेक फोटोस, व्हिडिओज हे देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी व्हाट्सअप नाही आता एक नवीन सुविधा लॉन्च केला आहे.
या सुविधेद्वारे तुम्ही व्हाट्सअप मध्ये आपल्याला येणारे कोणत्या लिंक्‍स आणि मेसेजेस फेक आहेत. हे ओळखू शकता.यासाठी व्हाट्सअप मध्ये काही बदल केले गेले आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना फेक मेसेज ची माहिती ही व्हाट्सअप मध्येच मिळणार आहेत.
ही सुविधा भारतात लॉंच केली गेली नाही. पण लवकरच ही सुविधा भारतात देखील मिळणार आहे अशी माहिती व्हाट्सअप ने दिली आहे.
या देशात सुरू आहे ही सुविधा.
WhatsApp चे हे फीचर सध्या ब्राझिल, इटली, आयर्लंड, मेक्सिको, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका याठिकाणी लाँच करण्यात आले आहे. हे फीचर लवकरच भारतात येण्याची देखील शक्यता आहे. हे फीचर अँड्रॉइड, आयओएस (iOS) त्याचप्रमाणे Whatsapp वेबसाठी देखील देण्यात आले आहे. यासाठी युजर्सना WhatsApp लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावे लागेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.